Gutkha Seized In Buldana: पोलिसांनी पकडला दीड कोटीचा गुटखा; 200 गोण्या जप्त - बुलडाण्यात गुटखा जप्त
🎬 Watch Now: Feature Video


Published : Sep 20, 2023, 4:34 PM IST
बुलडाणा Gutkha Seized In Buldana : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर नजीक जवळपास दीड कोटीचा प्रतिबंधित संशयास्पद गुटखा पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली आहे. (Gutkha smuggling in Buldana). राष्ट्रीय महामार्गावरून हॉटेल खालसाजवळ पोलिसांना एका बंद कंटेनरमधून गुटखा तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई (Gutkha smuggling containers seized) करण्यात आली. दरम्यान मलकापूर शहर पोलीस ठाणे आणि अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला. हा कंटेनर (क्रमांक 019196) हुबळी वरून भिवंडी येथे जात होता. तो खालसा ढाब्यावर उभा असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर कंटेनर उघडले असता त्यातील गोणींमधून प्रतिबंधित गुटख्याच्या जवळपास 190 पेक्षा अधिक गोण्या दिसून आल्या. कारवाईची कुणकुण लागताच कंटेनरचा ड्रायव्हर कंटेनर सोडून फरार झाला. (Gutkha seized) एकंदरीत कंटेनर्स व मालाची अंदाजित किंमत दीड कोटी सांगितले जात आहे. अशा मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन अलर्टवर आले आहे. प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी केल्यास तस्करीमागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शंका वर्तविण्यात आली आहे.