Yeola Protest: लव्ह जिहादच्या विरोधात येवल्यात हिंदुत्ववादी संघटनेचा तहसील कार्यालयावर भव्य मूकमोर्चा - हिंदुत्ववादी संघटनेचा तहसील कार्यालयावर मूकमोर्चा
🎬 Watch Now: Feature Video
येवला: सातत्याने लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींच्या होणाऱ्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ येवल्यात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने येवला तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा (Yeola Protest) काढण्यात आला. लव्ह जिहाद विरोधी कायदा (Anti Love Jihad Act) व धर्मांतर विरोधी कायदा (Anti Conversion Act) लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील सप्तशृंगी माता मंदिरापासून मोर्चास सुरुवात होऊन शनिपटांगण, मेनरोड ,काळा मारुती रोड, गंगादरवाजा या मार्गे तहसील कार्यावर कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला .यावेळी प्रत्येकाने हाताला काळ्या पट्ट्या बांधून दिल्ली येथील हत्याकांडाचा निषेध केला.या मोर्चात श्री राम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परीषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, करणी सेना, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना अशा अनेक हिंदुत्ववादी संघटनासह येवल्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST