Gangagiri Maharaj : वैजापूरमध्ये गंगागिरीजी महाराज यांचा १७६ व्या हरिनाम सप्ताह; सप्ताहाची गिनीज बुकात नोंद - Chhatrapati Sambhajinagar News
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 24, 2023, 9:04 PM IST
छत्रपती संभाजीनगर (वैजापूर): सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहास सोमवारी पासून वैजापूर शहर परिसरात सुरूवात झाली. अहमदनगर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील 2 लाखापेक्षा जास्त भाविक हरिनाम सप्ताहासाठी दाखल झाले आहेत. भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद देण्यात आला आहे. तर अखंड हरिनामाचा धार्मिक जागर हा सात दिवसांतील खास आकर्षण असतो. वैजापूर शहराजवळील लाडगाव चौफुलीजवळ या सप्तहाचे उत्कृष्ट नियोजन सप्ताह समितीने केले आहे. २०० एकर क्षेत्रावर अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहेत. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आले आहे. या प्रहरा मंडपात अखंड भजनाचे सुर घूमत आहेत. ८ ते १० हजार टाळकरी तीन प्रहरात उभे राहून हरिनामाचा गजर करत आहेत. याठिकाणी १६८ तास अखंड भजन चालणार आहे. या सप्ताह काळात २५ ते ३० लाख भाविक भेट देतील असे गृहित धरुन आमदार रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महंत रामगिरी महाराज यांची वैजापूर शहरातील संकटमोचक हनूमान मंदिरापासून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती .