Ganeshotsav Muhurta २०२३ : गणेशाच्या स्थापनेसाठी कधी आहे मुहूर्त; पाहा व्हिडिओ - ganesh chaturthi 2023 start
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 18, 2023, 9:06 PM IST
|Updated : Sep 19, 2023, 6:37 AM IST
नाशिक : Ganeshotsav Muhurta २०२३ : राज्यभरात आज गणरायाचं आगमन होत आहे. आज (19 सप्टेंबर) सार्वजनिक मंडळात तसेच घरोघरी बाप्पाची स्थापना होत आहे. यासाठी सूर्योदयापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत विशेष मुहूर्त आहे. तसेच आज दिवसभर गणेश मूर्तींची स्थापना (Ganesh Puja २०२३) करता येईल, असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितलंय. तसंच मूर्ती स्थापना करताना ती पीओपीची तसेच कुठल्याही रासायनिक पदार्थाची (Ganesh Sthapana २०२३) नसावी. शास्त्राप्रमाणे धातू, पाषाण (दगड) आणि माती या तीनच पदार्थांची प्राणप्रतिष्ठा होऊ शकते. त्यामुळं गणेश मूर्ती या मातीपासून बनवलेल्या असाव्यात तेव्हाच तुमची मूर्ती प्रतिष्ठापना ही शास्त्रानुसार ग्राह्य धरली जाईल. मूर्ती स्थापन करतेवेळी कलश पूजन, गणेश पूजन, गणपतीची अंग पूजा, गणेशाला पत्री अर्पण तसेच गणेशाला प्रिय (Ganesh Chaturthi २०२३) मोदकाचा नैवेद्य द्यावा. तसंच हळदी, कुंकू, गुलालाची उधळण करत गणेशाची महाआरती करून बाप्पाचा जयघोष करावा, अशा पद्धतीनं गणेशाची प्राणप्रतिष्ठा करावी, असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितलंय.