Ganesh Visarjan 2023 : 'हे' भटजी गेली 44 वर्षांपासून करतात 'लालबागच्या राजा'ची पूजाअर्चा...
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 28, 2023, 2:06 PM IST
मुंबई : अनंत चतुर्दशी हा गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. दहा दिवस उत्साहात गणेशोत्सव (Ganpati Festival 2023) साजरा केल्यानंतर 'पुढच्या वर्षी लवकर या' हा आग्रह करत आज भाविक बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध आणि लाडक्या 'लालबागच्या राजा'ची गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मनोभावे सेवा-पूजा करणारे गुरुजी अरविंद वेदांते हे गेली 44 वर्ष कोल्हापूरहून येतात. गुरुजी अरविंद वेदांते हे एका खासगी कंपनीत नोकरी करत असून केवळ दहा-बारा दिवस आपल्या लाडक्या 'राजा'ची ( Lalbaug raja ) सेवा करण्यासाठी ते कोल्हापूरहून मुंबईत येतात. दुपारची आरती आणि रात्रीची आरती तसंच दिवसभर 'लालबागच्या राजा'च्या चरणी बसून मंत्रोपचाराने बाप्पाची सेवा करण्याचा मान गुरुजी अरविंद वेदांते यांना मिळतो. अरविंद वेदांते यांनी ईटीव्ही भारतशी केलेली खास बातचीत.