Maharashtra Political Crisis : 'जो जसे करतो त्याला तसे फळ मिळते', महाराष्ट्राच्या राजकीय संकटावर भगतसिंह कोश्यारींची चुटकी - माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
🎬 Watch Now: Feature Video
डेहराडून - महाराष्ट्रात रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडी देशभर चर्चेचा विषय बनल्या आहेत. यावर सर्वच नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी 'जो जसा करेल तसे फळ चाखेल' असे विधान केले आहे. भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडताना त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली होती की, आता त्यांना राजकारणाच्या वरती उठून उत्तराखंडसाठीच काम करायचे आहे. चिंतनात वेळ घालवायचा आहे. त्यामुळे ते गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय घडामोडींवर भाष्य करत नव्हते. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचे वर्णन करण्यासाठी भगतसिंह कोश्यारी यांनी तुलसीदासांची मदत घेतली. भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, तुलसीदासांनी म्हटले आहे की, 'जो जसे करतो त्याला तसे फळ मिळते', हे सर्वांना लागू होते.