Ashok Chavan: काँग्रेस फुटीच्या खोट्या-नाट्या बातम्या करण्याचा विरोधकांचा डाव - अशोक चव्हाण - Sharad Pawar

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 10, 2023, 10:32 PM IST

नांदेड : खोट्या-नाट्या बातम्या पसरवून लोकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत होताना दिसत असल्यामुळे गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले असावे. महाराष्ट्रातला एकही नेता किंवा आमदार कोणाच्याही संपर्कात नसल्याचे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच लोकसभेच्या अगोदर अनेक घडामोडी समोर येतील असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. त्यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्याचबरोबर शरद पवार हे ज्येष्ठ नेते तसेच अनुभवी नेते आहेत. त्यांच्या पक्षात जे काय घडले हे दुर्दैवी आहे. आगामी काळात लोक ठरवतील काय योग्य, काय अयोग्य आमच्या सर्वांच्या शुभेच्छा असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.