FIFA World Cup 2022 फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर खेळवला जाणार - लुसैल आइकॉनिक स्टेडियम
🎬 Watch Now: Feature Video
फिफा विश्वचषक 2022 ( FIFA World Cup 2022 ) कतारमध्ये 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. पहिल्यांदाच फिफा विश्वचषक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहे. आतापर्यंत याचे आयोजन जून-जुलैमध्ये केले जायचे. विश्वचषकाचा पहिला सामना साठ हजार प्रेक्षक क्षमतेच्या अल बायत स्टेडियमवर ( Al Bayt Stadium ) खेळवला जाईल, तर अंतिम सामना लुसेल शहरातील लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर खेळवला जाईल. लुसेल आयकॉनिक स्टेडियम ( Lucelle Iconic Stadium ) हे प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने स्पर्धेतील सर्वात मोठे स्टेडियम आहे. येथे 86 हजार प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. आयकॉनिक स्टेडियम आता पूर्णपणे तयार आहे, ज्याचे औपचारिक उद्घाटन 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST