Beating The Dog: कुत्र्याला बेदम मारहाण! व्हिडिओ व्हायरल; तक्रार दाखल - रोहतकमध्ये एका व्यक्तीने कुत्र्याला बेल्टने मारले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 11, 2023, 9:59 PM IST

रोहतक (हरियाणा) : रोहतकमध्ये एका व्यक्तीने कुत्र्याला बेल्टने बेदम मारहाण केली आहे. मुक्या प्राण्याला मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे प्रकरण आर्य नगरचे आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीवर कुत्र्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका एनजीओच्या संचालकाने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, आझादगडचे रहिवासी असलेले तक्रारदार अरविंद सोनी रोहतक शहरात निराधार प्राण्यांच्या मदतीसाठी एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) चालवतात. फेसबुक या सोशल साइटवर त्यांनी एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कुत्र्याला बेल्टने बेदम मारहाण करताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.