Actor Satish Kaushik Funeral : अभिनेते सतीश कौशिक अनंतात विलीन; मान्यवरांनी व्यक्त केला शोक भावना - Actor Satish Kaushik funeral
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-17947766-thumbnail-4x3-mumbai.jpg)
मुंबई : मिस्टर इंडियात कॅलेंडरचा अभिनय करणारे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज निधन झाले आहे. त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे मित्र व अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून आज सकाळी दिली होती. सतीश कौशिक यांच्यावर आज रात्री अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सतीश कौशिक व अनुपम खेर यांनी फिल्म इन्स्टिट्यूमध्ये शिक्षण घेतले तेव्हापासून दोघांची मैत्री आहे. सतीश कौशिक यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीत विनोदी कलाकार म्हणून चांगले नाव कमविले होते. सतीश कौशिक यांचा हरियाणामध्ये 13 एप्रिल 1965 रोजी जन्म झाला 1987 मध्ये आलेल्या मिस्टर इंडिया चित्रपटात त्यांची कॅलेंडर ही भूमिका चांगलीच गाजली होती. सतिश कौशिक यांच्या निधनानंतर सर्व अभिनय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सतीश कौशिक यांचे पार्थिव त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आणण्यात आले होते. यावेळी अनुपम खेर, जावेद अख्तर आणि राज बब्बर, जावेद अख्तर, अशोक पंडित आदी कलाकारांनी शोक भावना व्यक्त केल्या.