Snakes Found in Thane : भक्ष्याच्या शोधात कोब्रा नाग घुसला कुंडीत; दुसरा विषारी साप बांधकाम साईटवर दिसल्याने कामगारांची पळापळ - दुसरा विषारी साप बांधकाम साईटवर दिसल्याने पळापळ
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : बदलत्या हवामानामुळे विषारी, बिनविषारी साप भक्ष्यासह थंड जागेच्या ठिकाणी असलेल्या मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज पुन्हा एक विषारी कोब्रा नाग भक्ष्याच्या शोधात सोसायटीच्या इमारतीत असलेल्या एका झाड्याच्या रिकाम्या कुंडीत फणा काढून बसल्याने रहिवाशांची वाट अडवल्याने एकच घबराट पसरली होती. ५ फुटांचा अत्यंत विषारी घोणस साप बांधकाम सुरू असलेल्या साईटवर दिसल्याने साईटवरील कामगारांनी पळ काढला होता. विषारी, बिनविषारी साप भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना सातत्याने घडतच आहे. आजही मानवी वस्तीत साप शिरल्याच्या पुन्हा दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत कल्याण पश्चिम भागातील साई सोसायटीत घडली असून, या सोसायटीच्या एका इमारतीच्या मुख्य प्रवेश दारातून कोब्रा नाग भक्ष्याच्या शोधात शिरला होता. मात्र, त्याला भक्ष्य मिळाले नसल्याने तो त्याच्या शोधात चक्क सोसायटीतील आवारात असलेल्या झाड्याच्या रिकाम्या कुंडीत फणा काढून बसला होता.