Snake In Shoes : विद्यार्थ्याच्या बुटात लपून बसला कोब्रा, अंगावर काटा आणणारा पाहा व्हिडिओ - वाइल्डलाइफ अँड नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 10, 2023, 12:36 PM IST
कोयंबतूर (तमिळनाडू) Snake In Shoes : कोईम्बतुर जिल्ह्यातील व्यंकटेश्वर नगर परिसरात गुरुवारी (9 नोव्हेंबर), प्रदीप नावाचा आठवीतील विद्यार्थी त्याच्या घरातील शू स्टँडजवळ गेला. तेव्हा त्याला त्याच्या शाळेच्या बुटामधून वेगळाच आवाज आला. त्यानं नीट बघितलं तर बुटाच्या आत त्याला साप दिसला. ते बघून मुलगा घाबरला अन् त्यानं त्याच्या आई-वडिलांकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्याच्या पालकांनी वाइल्डलाईफ अँड नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशनच्या सर्पमित्राला बोलावलं अन् त्यानंतर सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. सर्पमित्रानं हा साप कोब्रा जातीचा असल्याचं सांगितलं. तसंच पावसाळ्यात साप मोठ्या प्रमाणात फिरतात. ते आश्रयस्थानाच्या शोधात येतात आणि त्यामुळं ते शूजच्या आत जातात, असंही सर्पमित्रानं सांगितलं. दरम्यान, यानंतर पकडलेल्या कोब्राला सुरक्षितपणे जंगल परिसरात सोडण्यात आलं. सापाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.