Ganesh Festival २०२३ : मुख्यमंत्री शिंदे सलमान खानच्या घरी; गणरायाचं घेतलं दर्शन, पाहा व्हिडिओ - गणेश फेस्टिवल 2023
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 20, 2023, 11:02 PM IST
|Updated : Sep 21, 2023, 6:25 AM IST
मुंबई : Ganesh Festival २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बॉलिवूड अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता शर्मा हिच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. (CM Eknath Shinde) यावेळी त्यांनी सलमानची आई सलमा खान यांचीही भेट घेतली. तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी सलमान खान (Salman Khan Ganeshotsav) अर्पिता शर्मा यांच्यासह आई सलमा खान आणि आमदार रवींद्र फाटक आणि राहुल कनाल उपस्थित होते. (CM Shinde and Salman Khan meet) विनायक चतुर्थी निमित्ताने काल अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरी गणरायांचे आगमन झाले. अनेक सेलिब्रेटींनी मोठ्या धडाक्यात (CM Eknath Shinde visit Salman Khan) गणराजांच्या मूर्तीचे स्वागत करत आस्थापूर्वक स्थापना केली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्याकडे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक राजकारणी आणि इतर सेलिब्रेटीज त्याच्या या उत्सवात सहभागी होतात.