Watch Video : डोक्यावर पगडी, अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी; मंत्र्यांच्या पेहेरावाची सर्वत्र चर्चा - devendra fadnavis khandoba temple jejuri
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-08-2023/640-480-19206690-thumbnail-16x9-ajit.jpg)
पुणे : जेजुरी येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो पेहेराव केला होता त्याची चर्चा परिसरात रंगली होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दर्शन घेतल्यानंतर डोक्यावर पारंपारिक पगडी, अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी घेत गड उतरला. यावेळी माध्यांनशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सगळ्यांचे भले व्हावे असे साकडे आपण खंडोबा देवाला घातले आहे. जय मल्हारचे आशीर्वाद असेल की सगळे ठीक होते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जेजुरी येथे नेत्यांची रेलचेल दिसून आली. यामुळे खंडोबा मंदिरातही भाविकांनी आज गर्दी केली होती.