thumbnail

By

Published : Jul 14, 2023, 5:12 PM IST

Updated : Jul 14, 2023, 5:45 PM IST

ETV Bharat / Videos

Chandrayaan 3 Launch Video : चांद्रयान-3 अवकाशात झेपावले; पाहा व्हिडिओ

श्रीहरीकोटा : भारताचे ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan 3)  हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वी चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. त्यामुळे भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. रॉकेट' म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावले. देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह भारतीयांनी विजयी जल्लोष केला. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारताची चांद्रयान-3 ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल 615  कोटी रुपये खर्च केले आहेत. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 ने 40 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे.

Last Updated : Jul 14, 2023, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.