Accident CCTV : लॉरीने दुचाकीस्वाराला चिरडले, जागीच मृत्यू... पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ - कोईम्बतूर
🎬 Watch Now: Feature Video
कोईम्बतूर, तामिळनाडू, करणमपेट्टई येथील प्रवीण कुमार कोईम्बतूर येथील त्याचा मित्र श्रीहरीसह दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून मेट्टुपलायमला गेला होता. तेथून परतत असताना कालापट्टी चार रस्त्याजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. Lorry hitting Bike. यावेळी प्रवीणकुमार याच्या डोक्यावरून लॉरीचे मागचे चाक गेले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीहरी हा गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Lorry hitting Bike and killing one in Coimbatore. अपघातांतर परिसरातील लोक जखमींना वाचवण्यासाठी जमले. मात्र त्यानंतर दुचाकीला अचानक आग लागली. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. CCTV Footage of Lorry hitting Bike. कोविलपालयम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताचा तपास सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST