VIDEO : दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास - संकटातून बाहेर पडण्याची जिद्द बाळगली
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक असा द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवण्यात आला होता. मंदिरात नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर तसेच मोठ्या प्रमाणावर भक्त उपस्थित होते. आजच द्राक्ष महोत्सव झाल्यावर ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, तसेच ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात सलग दुस-या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती सध्या संकटाथ आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहेत. शेतक-यांनी संकटातून बाहेर पडण्याची जिद्द बाळगली आहे.