International Womens Day 2023: एका असामान्य विषयासाठी लढणारी सामान्य महिला - मनिषा सीलम
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : कोरोना काळात व्यक्ति व्यक्ति मधला संवाद हरवला आहे. अनेकजण मानसिक दृष्ट्या स्वमग्न झाल्याचे व्यथा समाजासमोर मांडल्या जात होत्या.पण जी मुले जन्मतः स्वमग्न स्वतःच्या कोषात राहतात.जेथे संवादाचा आणि संवेदनाचा अभाव असतो.अशा मुलांच्या भविष्याचे काय असा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर उभा राहतो. अशा स्वमग्न मुलांपैकी एक माता पालक जिचा मुलगाही स्वमग्न आहे. तिने समदुःखी समस्त पालक वर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. ठाण्यातील स्वमग्न मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन राजहंस फाऊंडेशन नावाची संस्था मनिषा सीलम यांनी स्थापन केली. या काळात ऑटिस्टिक या मानसिक अवस्थेत जगणाऱ्या मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, स्वमग्न मुलांच्या पालकाबरोबर संवाद साधण्यासाठी फेसबुक पेज आणि व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आला. ऑटिस्टिक मुले स्वतः च्या आत्मकोषातून बाहेर येत नाही. तुम्ही पालक या नात्याने त्यांच्या मनापर्यंत पोहचून संवेदना जाणून घ्यायच्या असतात.