Accident video : भरधाव बोलेरो अनियंत्रित; अनेकांना धडक देत वाहनांचा केला चुराडा.. घटना सीसीटीव्हीत कैद
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : नागपूर शहरातील ( Nagpur City ) सर्वाधिक व्यस्त असलेल्या सीताबर्डी ते पंचशील चौकदरम्यान ( Sitabardi and Panchsheel Chowk ) अतिशय विचित्र अपघात घडला आहे. प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी भरधाव वेगात जात असताना अचानक अनियंत्रित झाली. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने गाडी अनेकांना धडक देत थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना चिरडत ( Bolero Crushing Vehicles ) पुन्हा मुख्य मार्गावर आली. त्यानंतर मात्र, गाडीचा वेग कमी झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( Accident Captured in CCTV Camera ) झाली आहे. बोलेरोने धडक दिल्यामुळे एक कार, अनेक दुचाकी आणि काही सायकलींचे नुकसान झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST