पुण्यात ६९ व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवास प्रारंभ; पूर्वार्धात कलापिनी यांच्या गायनाने भरले रंग - गायक संजय गरूड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 9:55 PM IST

पुणे Sawai Gandharva Mahotsav : संगीतप्रेमींच्या सगळ्यात आवडत्या महोत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे. स्वरमय वातावरणात आज ६९ व्या 'सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा'ला दिमाखदार उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने या महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी सुरूवात राग मधुवंतीने केली. मोजक्या स्वरावलींतून रागरूप मांडून त्यांनी दाद मिळवली. त्यांना तबला-कार्तिक स्वामी, निखिल तुकाराम दैठणकर सनई सहवादन, सूरपेटी - गणेश दैठणकर, तानपुरा - केतकी दैठणकर आणि मयुरी दैठणकर यांनी साथसंगत केली. 'वैष्णव जन तो' या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली. तर गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील 'अब तो बडी देर' या रचनेतून केली. रागवाचक आलापीतून भीमपलासचा स्वरविस्तार त्यांनी उत्तम मांडला. त्याला जोडून द्रुत त्रितालात 'बीरज मे धूम मचाए शाम' ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. 'माझे माहेर पंढरी' या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.