उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी सकाळपासून येऊन बसलेत उस्मानाबादचे 62 वर्षाचे आजोबा - Dussehra gathering Uddhav Thackeray speech
🎬 Watch Now: Feature Video
Shivsena Dasara Melava 2022: मुंबई दसरा मेळावा अनेक शिवसैनिकांसाठी पर्वणी असते. कारण, शिवसेनेचे पक्षप्रमुख या दिवशी सर्व शिवसैनिकांना संबोधित करत असतात. Shivsena Dasara Melava 2022 अनेकदा दसरा मेळाव्यामुळे निवडणूक देखील चित्र पालटलेले पाहायला मिळाला आहे. त्यामुळे दसरा मेळावा म्हणजे अनेक शिवसैनिकांसाठी बूस्टर डोस मानला जातो. यावर्षी दसरा मेळावा अनेक शिवसैनिकांसाठी Shivsena Dasara Melava खास आहे. शिवसेना उभी फूट पडल्यानंतर अनेक शिवसैनिक आपली निष्ठा दाखवण्यासाठी सकाळपासूनच शिवतीर्थावर येऊन बसले आहेत. अशाच काही शिवसेनेकांपैकी एक आहेत उस्मानाबादचे 62 वर्षांचे आजोबा. वयोवृद्ध असून देखील फक्त उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हे आजोबा रात्री 3 वाजता उस्मानाबादहून निघाले आणि पहाटे मुंबईत पोहोचले. मुंबईत आल्यावर त्यांनी थेट मैदान गाठलं. मैदानात येऊन आपली जागा पकडली. आम्ही इथं साहेबांवरील निष्ठेसाठी आलोय, कारण ही शिवसेना आम्हा शिवसैनिकांची आहे. आम्हा निष्ठावांतांची आहे गद्दारांची नाही. अशी प्रतिक्रिया यावेळी या 62 वर्षाच्या आजोबांनी ईटीव्ही भारतची बोलताना दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST