25 Lakh Rupee Gutka Caught अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 25 लाखांचा गुटका पकडला - 25 लाखांचा गुटका पकडला
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड शहरातील मुरमुरा गल्ली भागात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने Food and Drug Administration nanded बुधवारी दुपारी धाड टाकून जवळपास २५ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. 25 lakh rupee Gutka caught. तीन शटरच्या दुकानांत पोत्यांमध्ये हा गुटखा कोंबून ठेवण्यात आला होता. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात Wazirabad Police Station गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात सीमावर्ती भागातून दररोज मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. नांदेड शहरातील प्रत्येक पानटपरीवर उघडपणे गुटखा विक्री केली जाते. परंतु अन्न व औषध प्रशासनाकडून अनेकवेळेला केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. बुधवारी मात्र औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त वंजारी यांच्यासह नांदेडच्या पथकाने वजिराबाद पोलिसांना सोबत घेऊन मुरमुरा गल्ली भागातील तीन दुकानांवर धाड टाकली. यावेळी एकजण घटनास्थळावरून पसार झाला, तर एकाला पोलिसांनी पकडले. रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद सुरू होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST