Pune News: जिमवर फोनवर बोलणे पडले महागात; तरुणांचा झाला जागीच मृत्यू - उजवी भुसारी कॉलनी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : सोमवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी येथील उजवी भुसारी कॉलनी येथे महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या ओपन जिमवर फोनवर बोलत असताना शॉक लागल्याने 23 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. अमोल शंकर नाकते (23 ) अस या तरुणाच नाव आहे. याबाबत माहिती अशी की अमोल हा इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करत होता. तो रोज मित्रांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजेच ओपन जिम वर यायचा. सोमवारी रात्री तो मित्रांकडे आला असताना त्याला एक फोन आला आणि फोनवर बोलत बोलत तो ओपन जिम वर बसला आणि काही मिनिटांमध्येच अचानक तो खाली पडल्याचे पाहून मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने पायाची बोटे काळे निळे झाले होते. डाॅक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. याबाबत अमोलचा भाऊ म्हणाला की महापालिकेच्या वतीने जिथे ओपन जिम बांधण्यात आली आहे. तिथे महावितरणचे वायर देखील गेले आहे. या वयरीने माझ्या भावाच मृत्यू झाला आहे.पोलीस कोणावरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे. आमची मागणी आहे की ज्या वायरीने शॉक लागला आहे. त्याच वयरिने त्याच मृत्यू झाला आहे. त्यामुळे याबाबत पोलीसांनी अनोळखी व्यक्ती किंवा पालिका किंवा महावितरण यांच्यावर गुन्हा दाखल करावा.