सारथीत कर्मकांड... मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सारथीच्या भूमिपूजनाला विरोध - Maratha Kranti Morcha on Sarathi Bhumi Pujan
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सुरू झालेल्या सारथी संस्थेत जी नवी प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे, त्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सारथीच्या नव्या जागेत करण्यात आले. या भूमिपूजनात धार्मिक पूजा अर्चना करण्यात आली आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आक्षेप ( Maratha Kranti Morcha oppose Sarathi Bhumi Pujan ) घेण्यात आले असून, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराला सारथीच्या अध्यक्षांकडून तिलांजली देण्याचे काम केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला. याचा विरोध देखील करण्यात आला. याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST
TAGGED:
Bhumi Pujan Sarathi