Offensive Post Against PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; पोलीस ठाण्यात काढायला लावल्या उठाबशा - भारतीय जनता युवा मोर्चा
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्ट ( Offensive Post Against PM Modi ) टाकणे एका जणाला चांगलेच भोवले आहे. ब्रम्हपुरी शहरातील कुर्झा वार्डातील युवकाने आक्षेपार्ह, अश्लील भाषेत फेसबुक पोस्ट केल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या ( Bharatiy Janata Yuva Morcha ) कार्यकर्त्यांनी या युवकाला पोलीस ठाण्यात उठाबशा करायला ( An apology was made to the police station ) लावल्या.
- परत चूक करणार नाही -
पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत आक्षेपार्ह, अश्लील भाषेत फेसबुक पोस्ट करणाऱ्या कुर्झा येथील राकेश कुर्जेकार याने ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे भाजपायुमो कार्यकर्त्यांसमक्ष, जाहीर माफी मागत दारूच्या नशेत सदर प्रकार घडला असल्याचे सांगितले. यापुढे अशी चूक करणार नाही असे म्हणत उठाबशा मारून माफी मागितल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला माफी दिली. यापुढे अशी चूक होणार नाही, अशी तंबी दिली. राकेश कुर्झेकार याने काँग्रेसच्या तिकिटावर नगरपरिषद निवडणूक लढविली असल्याचे समजते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST