Hijab Day Malegaon : मालेगावात हिजाब डे; हजारो मुस्लिम महिलांचे आंदोलन, पाहा VIDEO
🎬 Watch Now: Feature Video
मालेगाव (नाशिक) - उडुपी आणि चिकमंगळुर शहरांतल्या कॉलेजांमध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात ( Hijab Row Karnataka ) केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली. खरं तर 28 डिसेंबर 2021 ला पहिली घटना उडुपीमध्ये घडली. त्यानंतर 3 सरकारी कॉलेजेस आणि 2 खासगी संस्था अशा एकूण पाच शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली आहे. यातून एका नव्या वादाला सुरुवात झाली. आज एमआयएमकडून महिलांनी हिजाब व बुरखा परिधान करून मालेगावात हिजाब डे ( Hijab Day in Malegaon ) पाळण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. उपस्थित मेळाव्यात महिलांना हिजाब व बुरखा कायम परिधान करून आपल्या धर्माची शिकवण टिकवून ठेवण्याची शपथ देण्यात आली. तसेच आपले हक्क व अधिकारांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन मेळाव्यात करण्यात आले होते. यावेळी महिलांनी हिजाबच्या समर्थनात ( Malegaon Muslim women protest ) आंदोलन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST