VIDEO : मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'रेला' नृत्यात धरला फेर; गडचिरोली महोत्सवाचा प्रारंभ - gadchiroli festival
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित गडचिरोली महोत्सवाचा आज महाशिवरात्रीच्या दिवशी प्रारंभ झाला. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून साकारलेल्या महोत्सव उदघाटनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर उपस्थिती दर्शविली. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासींच्या पारंपारिक रेला नृत्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेर धरत युवकांचे मनोबल वाढवले.पोलिस दलातर्फे आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांची स्टॉलच्या माध्यमातून माहिती करून दिली जात आहे. या नक्षल संवेदनशील जिल्ह्यातील गुणवंत व गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजना पोचल्या पाहिजेत अशी भावना पालकमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडालवार, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख, सोमय मुंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST