VIDEO : रशियाच्या हल्लानंतर युक्रेनमध्ये कुठे धुराचे लोट, कुठे वाहनांच्या रांगाच रांगा - युक्रेनमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा
🎬 Watch Now: Feature Video
कीव (युक्रेन) - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia-Ukraine crisis updates ) युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत. शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटलं आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. युक्रेनने म्हटले आहे की रशियन गोळीबारात किमान 7 ठार, 9 जखमी झाले आहेत. प्रचंड तणावाची स्थिती असल्यामुळे नागरिक हे मोठ्या प्रमाणात कीव शहरसोडून जात आहेत. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST