इकबाल कासकरची पुन्हा ठाणे कारागृहात रवानगी - Iqbal Kaskar Thane Jail
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सहा दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ताब्यात घेतलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकरची आज ठाणे कारागृहात रवानगी झाली. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने इकबाल कासकर याला कोठडी सुनावल्याने ठाणे कारागृहात त्याची पुन्हा रवानगी करण्यात आली आहे. इकबालचा मोठा भाऊ आणि आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम आणि बहीण हसिना पारकर यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर इकबाल कासकरला देखील ताब्यात घेण्यात आले होते. इडी ने कासकरच्या कस्टडीत वाढ करण्याची मागणी न केल्याने मुंबई न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने कासकरची रवानगी पुन्हा एकदा ठाणे कारागृहात केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST