Shivaji Maharaj Jayanti : नाशकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रकाराने वाहिली अनोखी चित्रांजली - चित्रकार राजेश भिमराज सावंत
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - नाशिकचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश भिमराज सावंत यांनी शिवजयंती ( Shivjayanti ) निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapti Shivaji Maharaj Jayanti ) यांना अनोखी चित्राजंली वाहिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी वाढावी यासाठी ते वेळोवेळी नवीन किंवा थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी निमित्ताने शाळेच्या फळ्यावर सध्या खडूच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार असे व्यक्तीचित्रण व अक्षर लेखन करीत असतात. कला विश्वासाठी व रसिकांसाठी खास आकर्षण असते ते त्यांच्या या चित्राचे... असेच आज शिवजयंती निमित्ताने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विलोभनीय व्यक्तीचित्रण अत्यंत वास्तववादी व कलात्मक चित्रफलक साकारले आहे. या चित्रात महाराजांच्या चेहऱ्यावरील करारी नजर व तेजस्वी चेहरा व चित्राची एकूण मांडणी तसेच आत्मविश्वासाने फलकावर उमटवलेले मोजके जोरकस मास्टरस्ट्रोक हे रसिकांची दाद मिळवून जात आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST