अशी बनवा 'शिकंजी' - शिकंजी
🎬 Watch Now: Feature Video
लिंबूपाणी हे लोकप्रिय भारतीय पेय आहे. शिकंजी हा लिंबाच्या रसाचाच एक प्रकार आहे. शिकंजीत काळे मिठ, थोडी भाजलेली जिरे पूड घालून त्याची चव वाढवली जाते. शिकंजी हे पेय उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलीत राखण्यास मदत करते. शिकंजीमध्ये वापरलेले काळे मीठ आणि जिरे पूड पचनक्रियेसाठी देखील उपयुक्त आहे. पुदीनाची ताजी पाने घालून तुम्ही शिकंजीचा ग्लास छान सजवू शकता. आमची आजची ही रेसिपी बघून शिकंजी बनवून बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा.