VIDEO : संगमनेर तालुक्यातील बोरबन गावातील जमिनीला पडल्या भेगा - Fall to the ground sangmaner
🎬 Watch Now: Feature Video
संगमनेर (अहमदनगर) - तालुक्यातील डोंगरदऱ्याचा पठार भाग असलेल्या बोरबन गावातील टेकडवाडी परिसरातील घरांजवळ जमिनीला भेगा पडल्याचं समोर आलं आहे. ( Fall to the land Sangamner ) जमिनीला जवळपास अडीचशे फुट लांबीपर्यंत लांब भेग पडली आहे. या भेगा आणखी वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. सरपंचांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. या भेगा कशामुळे पडताहेत याचा शोध घेतला जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात अनेकदा भुकंपाचे सौम्य झटके बसत असतात. त्यातच आता जमिनीला भेगा पडत असल्याने बोरबन परिसरासह पठार भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नाशिक येथील मेरी संस्थेला याबाबत प्रशासनाने माहिती दिली आहे. हा नेमका प्रकार काय आहे? याचा अहवाल मिळाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST