पाहा, स्तुती आणि टीकेबद्दल अनन्या पांडे कसा करते विचार - खो गए हम कहाँअनन्या पांडे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 9, 2024, 2:45 PM IST
मुंबई - अभिनेत्री अनन्या पांडे, अलिकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'खो गए हम कहाँ' चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आनंदित झाली आहे. आपल्या कामाचे कौतुक झाले किंवा टीका झाली तरी स्थिर राहून परिस्थितीला समोरं जाण्याची कला तिनं अवगत केली आहे. तिच्या अभिनयाबद्दल तिला साकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी अनन्या सावध प्रतिक्रिया देताना दिसली.
चंकी पांडेची मुलगी असलेली अनन्या चुकामधून शिकण्याची तयारी ठेवत आली आहे. ती अभिनेत्री म्हणून घडत असलेल्याचे श्रेय ती मिळत असलेल्या अनुभवाला देते. 'खो गए हम कहाँ' आणि त्या अगोदर रिलीज झालेला 'गहराईयाँ' या चित्रपटातील तिच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती.
अर्जुन वरैन सिंग दिग्दर्शित 'खो गए हम कहाँ', सध्या नेटफ्लिक्सवर पाहता येईल. अनन्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये अक्षय कुमारसोबत 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर', विक्रमादित्य मोटवानेचा चित्रपट 'कंट्रोल' आणि तिची पहिली वेब सीरिज 'कॉल मी बे'चा समावेश आहे.
हेही वाचा -