Struck Lightning In Kolhapur : नारळाच्या झाडावर वीज कोसळून लागली आग; पाहा आग विझवतानाचा व्हिडिओ - Coconut trees lightning
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सायंकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावली. सकाळपासून कडकडीत उन्हानंतर सायंकाळी जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस ( Heavy rain in various parts of Kolhapur ) झाला त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कोल्हापूर शहरात सुद्धा ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस ( Heavy rain in Kolhapur ) झाला तर, एका ठिकाणी नारळाच्या झाडावर वीज ( tree was struck lightning in Kolhapur ) कोसळली. येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील चिले कॉलनी मध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने ( coconut tree was struck by lightning ) झाडाने पेट घेतला. नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST