फेरीवाला हल्ला : आम्ही हल्ल्याला घाबरत नाही, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची प्रतिक्रिया - hawker attack Kalpita Pimple injured
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - पालिकेच्या माजीवडा - मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांची बोटे छाटल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर पिंपळे यांना तत्काळ घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. यावर कल्पिता पिंपळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणार नाही, मी बरी होवून पुन्हा कारवाई करणार, आम्ही अधिकारी आहोत, आमचे कर्तव्य आम्ही करणार, पुन्हा जावून कारवाई करणार, असे अधिकारी पिंपळे म्हणाल्या.
Last Updated : Aug 31, 2021, 4:28 PM IST