केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतले विठुरायाचे मुख दर्शन - Union Minister Nitin Gadkari took darhsan of Vitthal-Rukhmini at Pandharpur
🎬 Watch Now: Feature Video

पंढरपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राज्यमंत्री सिंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, समिती सदस्य हभप शिवाजी महाराज मोरे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, माधवी निगडे आदी यावेळी उपस्थित होते. पंढरपूरला जोडणारे पालखी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत मंदिर समितीच्या वतीने सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.