राज्य सरकार येत्या गुरुवारी रिव्ह्यू पिटीशन दाखल करणार - संभाजीराजे छत्रपती - मराठा आरक्षणा बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद झाली. मराठा समाज आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्याचे यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत याबाबत चर्चा झाली. यावेळी रिव्ह्यू पिटीशन फाइल करण्याची मागणी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. त्या लक्षात घेऊन तातडीने रिव्ह्यू पिटीशन दाखल करू, असे यावेळी सांगण्यात आल्याचे संभाजीराजे म्हणाले.