दहावीचा निकाल ९५.३० टक्के...लवकरच ऑनलाइल निकाल जाहीर होणार! - दहावी बोर्ड
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावी बोर्डाचा निकाल उशिराने जाहीर करण्यात आला. यानुसार राज्यातील एकूण निकाल ९५.३० टक्के लागला असून सर्वाधिक निकाल ९८.७७ टक्के कोकण विभागाचा लागला आहे. मागील 15 वर्षांतील सवर्धिक निकाल लागल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. भूगोलाचा पेपर रद्द करावा लागल्याने अन्य विषयांतील गुणंच्या सरासरीचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. यंदा एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहवीची परीक्षा दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले.