VIDEO : त्रिपुरा येथील घटनेचे नांदेडमध्ये तीव्र पडसाद - ETV BHARAT MAHARSHTRA
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटायला लागले आहेत. नांदेड येथे काही मुस्लिम युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्या नंतर हे युवक आक्रमक झाले. शुक्रवारी दुपारच्या वेळी शिवाजीनगर येथील दुकानाची नासधूस करत, व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली. सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. यावेळी शिवाजी नगर, बरकत चौक, देगलूर नका या भागात प्रचंड दगडफेक करण्यात आली. मुख्य रस्त्यावर वाहन जाळत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. यामुळे नांदेड शहरात काहीवेळ तणावाचे वातावरण होते. या घटनेने नागरिक आणि पोलीस अधिकारी जखमी झाले आहे. पोलिसांच्या मध्यस्थी नंतर हा जमाव पंगावण्यात आला. दरम्यान शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.