माझ्यावरील बिनबुडाचेचे, सोमैयांवर करणार अब्रुनुकसानीचा दावा - मंत्री मुश्रीफ - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ करणार सोमैयांवर शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आरोप सोमैया यांनी केला. या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हणाले.