VIDEO : येवला तालुक्यातील काही गावांत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद - येवला अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
येवला तालुक्यातील काही गावांत धुमाकूळ घालत जनावरे फस्त करणारा बिबट्या आज सकाळच्या सुमारास साताळी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. 3 दिवसांपूर्वी हा बिबट्या महालखेडे येथे उसाच्या व मकाच्या शेतात मुक्तसंचार करीत असल्याचे एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केले होते. बिबट्या मुक्तसंचार करीत असल्याने परीसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती व बिबट्याला पकडण्यास पिंजरा लावण्याची मागणी देखील नागरिक करीत होते. त्यामुळे वनविभागाने साताळी येथे पिंजरा लावला असता बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.