पाहा मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील अपघात... सीसीटीव्ही फुटेज आले समोर - accident in mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईचा जोगेश्वरी पूर्वेत विक्रोळी लिंक रोडवर दुर्गा नगर जंक्शन या ठिकाणी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरला मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुर्गा नगर जंक्शनवरून जात असताना डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी चालकाला ठोकर दिली. आणि बेस्ट बसला जोरदार धडक दिली. यात बाईक वर बसलेले दोघ जण आणि बेस्ट बस चालकही जबर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या थरार अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन गुन्हा नोंदवला आहे. आणि पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत.
Last Updated : Aug 4, 2021, 1:13 PM IST