गणेश महिमा : जाणून घेऊया कसे पडले गणपतीचे विघ्न राजेंद्र नाव? - Glory to Mother Parvati
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुराणातील कथेनुसार पार्वती आणि तिच्या मैत्रिणी हास्यविनोद करत बसल्या होत्या. तेव्हा पार्वतीच्या वाचनातून एका बालकाचा जन्म झाला. त्या जन्मलेल्या बालकाला त्यांनी गणपतीची आराधना करण्यास सांगितले. त्यातूनच त्या बालकाने विघ्नहर्ता गणेशाची आराधना केली आणि विघ्नहर्ता गणेशाकडून आयुष्यात कोणत्याही कामात विघ्न येणार नाही, नेहमी माझे काम पूर्ण होईल असे वरदान मिळवले. हे वरदान मिळवल्यानंतर त्यांने असुसांशी मैत्री केली. आणि ममासुराने सर्वत्र उपद्रव्य माजवण्यास सुरूवात केली. देवलोक, शिवलोक आणि सर्व लोकांवर आक्रमण केले आणि त्यांना बंदी करत केला. त्याचा संहार करण्यासाठी सर्व देवांनी गणपतीची आराधना केली आणि गणपतीने विघ्न राजेंद्र या रूपात त्याचा संहार केला. ममा सूराचा संहार करण्यासाठी गणपतीने विघ्न राजेंद्र हे रूप धारण केले अशी आख्यायिका आहे.