कोरोनावरील लस आहे, पण देता येईना, नव्या नियमांमुळे गोंधळ - कोरोनावरील लसीकरणा बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - लसीकरणासाठी घालून देण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे आज पुण्यात गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले आहे. कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवून 84 ते 112 दिवस करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील लसीकरण केंद्र आज ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे महापालिकेकडे आज 7500 लशीचे डोस आले आहेत. त्यामुळे महापालिकेने आज कोविशील्ड लशीच्या दुसऱ्या डोससाठीच लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, नव्या नियमानुसार कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये आता 84 दिवसाचे अंतर बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण आज लसीकरण केंद्रावर जाऊन लस न घेताच परत आले आहेत. लसीकरण केंद्रावरून याचा आढावा घेतला आहे, प्रतिनिधी किरण शिंदे यांनी...