Status Of COVID-19 In Goa : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारपासून कडक निर्बंध - मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 29, 2021, 6:46 AM IST

राज्यात एकीकडे नववर्ष स्वागताची लगबग सुरू झाली असताना दुसरीकडे मात्र कोरोनामुळे पुन्हा एकदा राज्यात निर्बंध कडक ( Covid in goa ) होण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ( Chief Minister Pramod Sawant on Covid ) वर्तविली आहे. राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा टास्क फोर्सची एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी काळात राज्यातील कोविड परिस्थिती लक्षात घेत निर्बंध कडक करण्यात येणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधीचा निर्णय येत्या सोमवारी घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षपर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असून त्यासंबंधीची पूर्ण तयारी झाली आहे. 1 जानेवारी पासून याची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच 10 जानेवारी पासून फ्रंट लाईन वर्कर व हेल्थ वर्कर याना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचेची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.