VIDEO : बलिप्रतिपदेनिमित्त संतज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची सजावट - etv bharat maharshtra
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात बलीप्रतिपदेच्यानिमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच मंदिरात सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक समाधी मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहतात. परंतु कोरोनाच्या निर्बंधामुळे मुख दर्शनाचीच व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी मंदिरात विधिवत पूजाअर्चा आरती झाल्यानंतर दिवाळी पहाट केतन अत्रे यांच्या शास्त्रीय संगीताने भाविक मंत्रमुग्ध झाले. या वेळी दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत असल्याची माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली आहे.