केंद्राच्या थकबाकीचा विचार सोडून राज्याला पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री - राज्याला पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सादर केला. राज्याची एकूण आर्थिक वाटचाल ठरवून विकासाला दिशा दिली जाते. हे वर्ष आवाहानचे आहे. कोरोनामुळे जगाची आर्थिक वाटचाल मंदावणारी होती. केंद्राकडून येणाऱ्या थकबाकीचा उल्लेख न करता, रडगाणे न करता राज्याला पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर केला. महिलांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दळवळणाला गती देणारा हा अर्थसंकल्प सादर केला. जनतेच्या आशीर्वादाला धक्का लागू देण्याचे काम करणार नाही,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई महापालिका समोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला अशी टीका म्हणजे भाजपाने मुंबईवरचा राग व्यक्त केला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Last Updated : Mar 8, 2021, 5:47 PM IST