VIDEO : भाजपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13706681-503-13706681-1637594007716.jpg)
मुंबई - नांदेड अमरावती व मालेगाव येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, मुंबई तर्फे वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यात खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार,आमदार सुनील राणे आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. आंदोलनादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळेस विविध ठिकाणी पोलिसांनी केवळ भाजप कार्यकर्त्यांच अटक करत एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात जोरदार आंदोलन उघडणार असल्याचा इशारा भाजपने दिला होता.