दुकाने 8 पर्यंत सुरु करण्याची परवानगी द्या अन्यथा... काय म्हणाले तुळशीबागेतील व्यापारी... पहा VIDEO - Weekend lockdown
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली पुण्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे तुळशीबाग. या तुळशीबागेत 600 ते 700 छोटी मोठी दुकाने आहेत. महिल्यांच्या दागदागिन्यांपासून ते सर्वच साहित्य या बाजारपेठेत मिळतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवावी लागत आहेत. तसेच शनिवार, रविवार बंद असतात. पण सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तुळशीबागेतील व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. यामुळे राज्य सरकारने आता विकेंड लॉकडाऊन न करता दुकानांची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत करावी. अन्यथा आम्ही रस्त्यांवर उतरू अशी भूमिका येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 1 ऑगस्ट रोजी राज्यात काही भागात निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याबाबत तुळशीबागेतील व्यापाऱ्यांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे.