Kashmir Files Tax Free : राम कदमांचा सरकारला इशारा; काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करा, अन्यथा... - अजित पवार काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली ( Bjp Demand Kashmir Files Tax Free ) होती. मात्र, केंद्राने केल्यास संपूर्ण राज्यात करमुक्त होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही मागणी ( Ajit Pawar On Kashmir files ) धुडकावून लावली आहे. त्यावर भाजपा आमदार राम कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर, त्यांनी हा चित्रपट करमुक्त केला ( Ram Kadam On Kashmir Files ) असता. मात्र, या सरकारला हिंदूंचे काही पडलेले नाही. हिंदूंच्या व्यथा हे सरकार समजू शकत नाही आणि म्हणूनच जर हा चित्रपट करमुक्त केला नाही. तर, जनता रस्त्यावर उतरून तांडव करेल, असा इशाराही राम कदम यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST